चंद्रदीप नरकेंनाच करणार आमदार ; कोथळी सभेत महिलांचा निर्धार

कोल्हापूर : मा.आमदार चंद्रदीप नरके यांचे प्रचारार्थ कोथळी (भोगावती परिसर) येथे महिला मेळावा पार पडला. यावेळी महिलांचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला. लाडकी बहिण योजनेसह सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे महिलांचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि एकूणच महायुतीला भक्कम पाठिंबा आहे. माझ्या माता भगिनींनी विजयासाठी दिलेला हा आशिर्वाद आहे.असे चंद्रदीप नरके म्हणाले. 

 

 

यावेळी श्रीमती शैलजा शशिकांत नरके, राजलक्ष्मी चंद्रदीप नरके, डॉ.सौ.सुप्रिया पाटील, शिवसेना निरिक्षक शारदा जाधव, ऐश्वर्या नरके-पोळ, सौ.देविका नरके-फाटक, प्रिया क्षीरसागर,जिल्हा महिला प्रमुख – शिवसेना शुभांगी पोवार, कांडगाव सरपंच तेजस्विनी चव्हाण, मा.पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील, हळदी सरपंच प्रज्ञा पाटील, परिते मा. सरपंच अक्काताई कारंडे, कोथळी मा.उपसरपंच वंदना पाटील आदि मान्यवर महिला उपस्थित होत्या.

🤙 8080365706