सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन विकास साधणारे नेतृत्व म्हणजे ऋतुराज पाटील ; सतेज पाटील

कोल्हापूर:कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ सतेज पाटील तसेच मधुरिमाराजे छत्रपती व विजय देवणे यांच्या उपस्थितीमध्ये क्रशर चौक, सानेगुरूजी येथे जाहीर सभा पार पडली.

 

 

यावेळी सतेज पाटील नागरिकांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देणे गरजेच आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना साने गुरूजी प्रभागातील मतदार भक्कम पाठींबा देतील याची खात्री आहे.

यावेळी महाडिक गटाचे प्रसन्न पडवळे आणि तानाजी इंगळे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून ऋतुराज पाटील यांना पाठींबा दिला.

या प्रसंगी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भरत लोखंडे, अभिजीत चव्हाण यांच्यासह जे. के. पवार, संजय सावंत, अशोकराव खोत, उदयराव गायकवाड, सुनिल देसाई, सदानंद कवडे, सुयोग मगदुम, राणी खंडागळे, कुलदिप सावरतकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706