मौजे आगर : विरोधकांकडे कोणतेही भांडवल नसल्याने केवळ टीका आणि विरोध म्हणून आमदार यड्रावकर यांना लक्ष केले जात आहे, अगोदर तुम्ही काय केला आहे, आणि काय करणार आहे ? ते सांगा मगच आमदार राजेंद्र पाटील यांच्यावर टीका करा’ असा घाणाघात बहुजन विकास आघाडीचे नेते रणजीत पाटील यांनी केला.मौजे आगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते,ते पुढे म्हणाले,जातीचे राजकारण करून निवडणुकीत यशस्वी होता येत नाही.त्यासाठी आमदार यड्रावकर यांच्यासारखी भरीव विकास कामे केली पाहिजेत,तेव्हा मतदारांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता २० तारखेला शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून निवडून द्यावे,असे आवाहन केले.
माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले,यड्रावकर यांच्या विजयासाठी केवळ पंधरा दिवस राबा ते तुमच्यासाठी पाच वर्ष झटतील,असे सांगून शिरोळसह मौजे आगरचा विकास त्यांनी केला आहे.त्यामुळे शिरोळसह आगर मध्ये उच्चांकी मतदान मिळणार हे नक्की आहे. सरपंच अमोल चव्हाण म्हणाले, केवळ आमदार यड्रावकर यांच्याचमुळे आगर भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे,आगर मधील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाणी प्रश्न त्यांनी निकाली काढला आहे, त्यामुळे आगर मधील सर्व मतदार यड्रावकर यांनाच निवडून देतील,अशी खात्री व्यक्त केली.
मौजे आगर येथे आमदार रावकर यांची जनसंवाद यात्रा संपन्न झाली.यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुभाषसिंग रजपूत यांनी केले.यावेळी सतिश मलमे, बाबा पाटील,बजरंग काळे,विजय माने – देशमुख,शहाजी दाभाडे,फत्तेसिंह मोरे,अमोल आडके,दत्तात्रय माने पाटील,जगन चव्हाण,रंगराव नारंगीकर,भाऊसो खडके,शिवाजी पोतदार,मारुती आडके,मारुती भूगोलकर,बाळासो चव्हाण,गोविंद गुरव,अनिल माने,गोविंद बोडके, शिवाजी नारंगीकर,साहेबजी गवंडी, विलास पाटील,दीपक पाटील,सागर चव्हाण,रफिक जमादार,राजीव दाभाडे, सुरेश आडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.