कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप उपक्रमाअंतर्गंत महापालिकेच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत शहरातील 15 कॉलेच्या विद्यार्थ्यामार्फत दि.11 ते 17 नोव्हेंबर 2024 अखेर विविध ठिकाणी पथनाटयाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात आज सकाळी महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकातून करण्यात आली. हे पथनाट्य के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगकडील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचबरोबर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय व कावळा नाका येथील स्टार बाजार येथे पथनाटय सादर केले.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 274 दक्षिण व 276 उत्तर मतदार संघासाठी प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रमाच्या सब नोडल ऑफिसर वर्षा परीट व प्रशासनाधिकारी आर.व्ही. कांबळे हे स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहेत. या कार्यक्रमांतर्गंत मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, आपल्या एक एक मताचे महत्व जनतेला कळावे व मतदानाचा 100 टक्के अधिकार जनतेने बजावावा याकरिता हि जनजागृती करण्यात येत आहे. हे पथनाटय सादर केलेनंतर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी महापालिकेच्या सहा. आयुक्त नेहा आकोडे, प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
के.आय.टी.कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगकडील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाटयाचे नियोजन के.आय.टी.चे संचालक डॉ.मोहन बी. वनरोट्टी, एन.सी.सी. कोऑर्डिनेटर, असि. प्रो. वसुंधरा महाजनी, असि. प्रो. एन.सी.सी. निवास पाटील, शिवप्रसाद माजगांवकर यांनी केले.
मंगळवार दि.12 ते 17 नोव्हेंबर 2024 पासून के. आय. टी. कॉलेज, कॉमर्स कॉलेज, छत्रपती शाहू कॉलेज, सायबर कॉलेज, महावीर कॉलेज, न्यु. कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, डॉ.डी.वाय.पाटील (इंजिनिअरींग कॉलेज) यांच्यावतीने शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर केले जाणार आहे. तर शहाजी कॉलेज, कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल, मेन राजाराम कॉलेज, डि.डि.शिंदे सरकार कॉलेज, डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज, न्यु कॉलेज यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्यावतीने मतदान जनजागृवर पोवाडा सादर केला जाणार आहे.