कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील साने गुरुजी वसाहत, रिंग रोड आणि उपनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माझ्या आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत महाडिक गटाचे कुलदिप सावरतकर आणि कुमार चौगुले तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रताप तराळ यांनी आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मागील निवडणुकांप्रमाणे यंदाच्याही निवडणुकीमध्ये एकजूटीने काम करून महाविकास आघाडीला निर्णायक मताधिक्य देण्याचा निर्धार केला.
याप्रसंगी माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण, भरत लोखंडे यांच्यासह जे. के. पवार, सदानंद कवडे, अभिजीत खतकर, युवराज तेली, नंदु पिसे, रमेश चावरे, जे. के.कांबळे, गुरुप्रसाद जोशी, शिवाजी मोरे, राणोजी चव्हाण, किरण पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.