कोल्हापूर : अण्णाभाऊ उद्योग संस्था समूहाचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा अण्णाभाऊ आजरा शेतकरी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पार पडला. या मेळाव्यात राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून प्रकाश आबिटकर यांना जाहीर पाठिंबा दिला.
प्रकाश आबिटकर म्हणाले, नेहमीच अशोक अण्णा चराटी यांची स्पष्टपणे भूमिका असते. चराटी यांची स्पष्ट भूमिका सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी असते. त्यांच्या पाठींब्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील उच्चांकी मताधिक्याची परंपरा कायम राहणार आहे. राज्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. गेल्या सहा महिन्यात लोकहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.
यावेळी जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेशआण्णा कुरुणकर, आजरा बँकेचे संचालक विलास नाईक, जनता शिक्षण संस्था संचालक विजयकुमार पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, दशरथ अमृते, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जी.एम.पाटील, राजेंद्र पोतनीस, गोविंद गुरव, संजय च्हाध्ण, दिलावर चँद, दरवाजकर, नंदइकुमार देसाई-सरकार, लहू वाकर, निवृत्ती शेंडे, पांडुरंग लोंढे, कृष्णा येणसे, मराठा महासंघ अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, प्रकाश कोंडूस्कर, डॉ.संदीप देशपांडे, समीर पारदे, योगेश पाटील, प्रकाश कोंडूस्कर यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.