कोल्हापूर : समरजीत घाटगे यांनी कागल तालुक्यातील करनूर गावात जाहीर सभा आयोजित केली असता त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
याप्रसंगी घाटगे म्हणाले, मराठा भवनसाठी मंजूर निधी विकासकामे झाली नसताना गेला कुठे, याचा विचार नागरिकांनी करायची वेळ आली आहे, असे सांगितले. आपल्या लाडक्या चार कॉन्ट्रॅक्टरसाठी मतदारसंघाला दावणीला बांधणे, आता मतदारराजा खपवून घेणार नाही, असे सांगताना ही परिवर्तनाची लढाई आपण जिंकणारच, असा संकल्प समरजेत घाटगे यांनी केला.