बहुजन विकास आघाडीचा यड्रावकरांना पाठिंबा

कोल्हापूर : शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीची बैठक बुधवारी स्व. दिलीपराव पाटील यांच्या निवासस्थानी झाली.या बैठकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. ही घोषणा आघाडीचे प्रमुख व स्व.दिलीपराव पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह दिलीपराव पाटील यांनी केली.

 

 

स्व.दिलीपराव पाटील यांनी सरपंच ते गोकुळचे चेअरमन या पदावर काम करताना सर्वांना सोबत घेतले.बहुजन विकास आघाडीचे तालुक्यात सर्वसामान्य,गरीब,कष्टकरी,श्रमिकांना न्याय मिळाला म्हणून काम केले.या आघाडीला आता चेहरा मिळाला आहे,हेच काम ताकतीने होईल,आमचे बळ तुमच्या सोबत आहे असे मत यावेळी व्यक्त केले.यावेळी जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील,समितीचे सदस्य उपस्थित होते.