समरजीत घाटगे गटाला कागलमध्ये भगदाड ; घाटगे गटाला रामराम ठोकून मुश्रीफ गटात प्रवेश

कोल्हापूर: कागल शहरातील समरजीत घाटगे गटातील सामाजिक कार्यकर्त्यां वैशाली संजय गाडीवड्ड यांच्यासह संजय गाडीवड्ड, शुभम संजय गाडीवड्ड, सुशांत संजय गाडीवड्ड, सुमित संजय गाडीवड्ड यांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्कार्प गळ्यात घालून पक्षात स्वागत केले.

 

 

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, शहराध्यक्ष संजय चितारी, अर्जुन नाईक, अशोक वड्ड, सतीश घाडगे, सनी जकाते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545