राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या वतीने भव्य महिला मेळावा

कोल्हापूर : करवीर मतदार संघातील राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटना यांच्या वतीने भव्य महिला मेळावा दत्त मंगल कार्यालय, रंकाळा
येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राहुल पाटील उपस्थित राहून करवीर विधानसभा मतदार संघातील महिलांशी संवाद साधला.राहुल पाटील यांच्या समवेत त्यांचा पत्नी तेजस्विनी राहुल पाटील या देखील उपस्थित होत्या .

 

 

यावेळी राहुल पाटील यांनी मेळाव्याला हजर असलेल्या अथांग महिला सागराचे दर्शन घेऊन नवी ऊर्जा मिळाली. या महिला मेळाव्यास आलेल्या सर्व माता भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले

यावेळी ज़िल्हा अध्यक्ष शिवाजी कवठेकर , संजय सुता,र ग्रामपंचायत व राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेचे सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.