पिंपळगाव खुर्द  येथील समरजीत घाटगे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द, ता. कागल येथील पंडीत आकुर्डे व अमर आकुर्डे यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे स्कार्प गळ्यात घालून पक्षात स्वागत केले.

 

 

यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफम्हणाले, पिंपळगाव खुर्दच्या प्रमूख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी मध्यरात्रीसुद्धा हाकेला ओ देऊन मी या सर्वांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष नवल बोते, एम.आर‌.चौगले गुरुजी, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन महेश चौगले, अशोकराव नवाळे, शिवाजी घाटगे, पिंटू कांबळे, सरपंच शितल नवाळे, राहूल पोवार, अमोल नवाळे, मान्यवर उपस्थित होते.