मूरगूड येथे समरजीत घाटगेंनी वृत्तपत्र विक्रेत्यांशी संवाद साधला

कोल्हापूर:मूरगूड येथे वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त समरजीत घाटगे हे उपस्थित राहून, वृत्तपत्र विक्रेता बांधवांशी संवाद साधला. आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला जाहीर पाठिंबा आम्हा सर्वांचे मनोबल वाढवणारा असून याबद्दल त्यांचे घाटगेंनी आभार व्यक्त केले.

 

 

 

आपल्या कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरमध्ये सर्वांगीण विकास साधण्यासाठी घाटगे घर नेहमीच तत्पर राहिले असून हाच राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आहोत, असे प्रतिपादन वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवगोंडा खोत यांनी केले.