ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पाचगावातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

कोल्हापूर: पाचगाव येथील महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पौंडकर यांच्यासह महादेव तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.

 

 

यावेळी सरपंच प्रियांका संग्राम पाटील, उपसरपंच अमित कदम, माजी सरपंच संग्राम पाटील , नारायण गाडगीळ, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, जिल्हा बँक संचालिका स्मिता युवराज गवळी यांच्यासह युवराज गवळी, योगेश जाधव, अमित जाधव, योगेश बागडी, प्रदीप गाडगीळ, प्रणव गुरव, राहुल कांबळे, अभिजीत कांबळे, धीरज पाटील, सुरज सुतार, दत्ता नलवडे, वैभव सस्ते, आकाश कोतेकर, अमित चव्हाण संजय पाटील, सचिन पाटील, अश्विनी चिले, विजय शिंदे, शिवाजी पौडकर, सर्व आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.