सोनाळीतील श्री. नागनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या कर्जमुक्त सभासदांकडून हसन मुश्रीफ यांचा सत्कार

कागल: सोनाळी, ता. कागल येथील थकबाकीत असलेल्या श्री. नागनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या सभासदांची कर्जमुक्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कृतज्ञतापूर्वक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला. कागल निवासस्थानी भेट घेऊन सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

 

 

सोनाळी ता. कागल येथील नागनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था गेली अनेक वर्ष थकबाकीत होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर या कर्जाचा बोजा नोंद झाल्याने संबंधित शेतकरी अडचणीत सापडले होते. गेली अनेक वर्ष कर्जमाफीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नुकताच महायुती सरकारने अशा पाणीपुरवठा संस्थांची कर्जमाफी करण्याचा अध्यादेश काढला. या कामी मुश्रीफ यांचे विशेष योगदान लाभल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगीतले.

डी. एम. चौगुले सोनाळीकर म्हणाले, अनेक वर्ष कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या पाणीपुरवठा संस्थेच्या गोरगरीब सभासदांना पालकमंत्री हसनमुश्रीफ यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे.

यावेळी डी. एम. चौगले, एन. एस. चौगले, पी. व्ही. पाटील, सिताराम लोंढे, बाळासो कपले, रणजीत शेणवी, नामदेव भोसले, आनंदा चौगले यांच्यासह संबंधित पाणीपुरवठा संस्थेचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.