ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत राजलक्ष्मीनगर येथील विविध विकासकामांचे उदघाटन

कोल्हापूर: राजलक्ष्मीनगर (प्र. क्र. 70) येथे 35 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. रस्ता काँक्रिटीकरण, अंतर्गत गटर्स करणे, सभागृह बांधणे आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.

 

याप्रसंगी माजी नगरसेविका दीपा मगदूम, श्रीयुत परीट, सुभाष नाईक, जयवंत पाटील, ऍड. उदयराज बडसकर, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, किरण भोसले, उर्मिला पोवार, डॉ. ऋतुजा बडसकर, सुनीता नाईक, दिपाली पाटील, सौ. गिरीगोसावी, दत्ता बामणे, शुभम बामणे, अभी सासणे, यांच्यासह नागरीक उपस्थित होते.