कोल्हापूर: जयसिंगपुर येथील पायोस हॉस्पिटलमध्ये एका तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे, हार्दिक प्रकाश रुपानी (वय 38, रा. जयसिंगपूर) असं या तरुणाचं नाव असून हार्दिक यांनी पायोस हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
मयत हार्दिक प्रकाश रुपानी यांचे वडील पायोस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते, त्यांच्या जवळ मुक्कामासाठी हार्दिक रूपानी होता, त्यान पायोस हॉस्पिटलमध्ये 14 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, याबाबत विदिक कनक वेद (रा. गणपती पेठ, सांगली) यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, या दुर्दैवी प्रकाराने जयसिंगपूर शहरात खळबळ उडाली आहे, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल स्मिता कांबळे ह्या करीत आहेत,