कोल्हापूर : मायमराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, हा अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. हा आनंद साजरा करण्याची संधी देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
तसेच यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचे मुश्रीफ यांनी आभार मानले. तसेच या मागणीसाठी महाराष्ट्राच्या व मराठी भाषेच्या ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे अभिनंदन केले.