करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी 1 कोटी 84 लाखाचे दान

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील 10 दान पेट्यांची मोजदाद देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे पूर्ण करण्यात आली. या पेट्यामध्ये भाविकांकडून 1 कोटी 84 लाख 4 हजार 70 रुपयांचे दान करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीतर्फे करण्यात आली.

18 ते 21 सप्टेंबर या चार दिवसाच्या कालावधीत देवस्थान समिती कार्यालयासमोर ही मोजदाद करण्यात आली. सीसीटीव्ही, पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या नजरेखाली देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी ही मोजदाद केल्याची माहिती व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.