मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा रद्द 

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बरी नाही त्यामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून नाम फाउंडेशन ही सामाजिक संस्था २०१५ स्थापन केली होती. संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नाम फाउंडेशन ही सामाजिक संस्था मदत करते आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते.