चाळीसगाव : महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
चाळीसगांव येथील नूतन उपविभागीय उपप्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, राज भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, संजय गरूड, जिल्हा बॅक अध्यक्ष संजय पवार, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपआयुक्त श्याम लोही, मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे, प्रांताधिकारी प्रमोद हिले,अपर पेलिस अधीक्षक कविता नेरकर आदींसह आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्य व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.