महादेवाला प्रिय अशा बेलपत्राचे महत्त्व

शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. बेल पत्र वाहतात. बेल पत्र हे भगवान शंकराला प्रिय आहे, ते वाहिल्याने देव प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते.पण तुम्हाला माहित आहे का की, जेवढं या बेल पत्राचं अध्यात्मिक किंवा धार्मिक महत्व आहे, तेवढंच त्याचं आयुर्वेदिक महत्वही खूप आहे. बेल पत्र अनेक दूर्धर आजारांवर प्रभावीरित्या गुणकारी ठरू शकतं असं तज्ज्ञांच मत आहे. जाणून घेऊया महत्व.

बेल या वनस्पतीचे जेवढे अध्यात्मिक महत्त्व आहे. तेवढेच आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.बेलाच्या पानाचा 30ml रस रोज सकाळी उपाशीपोटी पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो.️बेलाच्या पानाचा दोन दोन थेंब रस डोळ्यांमध्ये टाकल्याने डोळ्याचे विकार दूर होतात.️ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते अशा लोकांनी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची तीन-चार पाने चावून खावीत.️

दहा-पंधरा बेलाची पाने चेचून एक कप तिळाचे तेल गरम करून घ्यावेत हे तेल कानामध्ये टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात.️बेलाच्या पानाचा रस पिल्याने किडनी व यकृताच्या समस्या दूर होतात.️कच्चा बेलफळाचा रस पिल्याने पोटाच्या समस्या जसे पोटामध्ये मुरडा येणे पोट दुखणे आतड्यावर सूज असणे अल्सरेटिव कोलाइटिस यासारख्या समस्या दूर होतात.बेल पानाचा रस 30 ते 40 ml सकाळी उपाशीपोटी पिल्याने हृदयाच्या सर्व समस्या निघून जातात व त्याचे कार्य सुधारते.

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आम्ही या गोष्टीची कोणतीही पुष्टी करत नाही.