राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या वाढदिवसास मान्यवरांकडून शुभेच्छा

कोल्हापूर (प्रतिनिधी) शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी माजी गृह राज्यमंत्री व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.सतेज पाटील, शहराध्यक्ष आर के.पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोदी व रामराजे कुपेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन व्ही.बी. पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर व ग्रामीण भागातील सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्ही.बी. पाटील यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला.

याप्रसंगी नितीन भाऊ पाटील शिवानंद माळी, सुनील देसाई पद्मजा तीवले, चंद्रकांत वाकळे रमेश पवार, बी.के चव्हाण, गणेश जाधव, विनय कदम, एम. एस. खापरे, नितीन पाटील, अमर पाटील, सादिक अत्तर, अरुणा पाटील, श्रीकांत पाटील, पंडित कळके, सुरेश पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील इत्यादीं सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.