पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 साठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

 कोल्हापूर (प्रतिनिधी) जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून सन 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करणा-या जिल्हापातळी ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत विविध संस्थाना व वैयक्तिक स्तरावरून नामांकन भरणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.


नामांकन हे प्रामुख्याने जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविण्यपूर्ण काम करणारे उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट शाळा व महाविद्यालय, उत्कृष्ट संस्था (शाळा व महाविद्यालय वगळून), उत्कृष्ट समाज संस्था, उत्कृष्ट पाणी वापर संस्था व उत्कृष्ट काम करणारी व्यक्ती यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (www.awards.gov.in )   अर्ज भरणे आवश्यक आहे. नामांकन भरण्यासाठी दरम्यान मागील एक वर्ष कालावधीत जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित काम केलेल्या संस्था व व्यक्ती या पात्र असणार आहेत.

नामांकन भरण्याची पध्दती अशी आहे
Google मध्ये www.awards.gov.in वर जावे.
स्क्रिनच्या उजव्या बाजूस Register चे बटन क्लिक करावे.
सदर स्क्रिनवरती वैयक्तिक () व संस्था () अशी 2 बटणे दिलेली असून नामांकन भरणारे ज्या प्रकारातून भरणार आहेत त्याच बटणावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून सबमिट करावे.
नामांकनाची नोंद करताना जो मोबाईल नंबर नमूद करण्यात येणार आहे, सदर मोबाईल नंबर हा आधार क्रमांकाशी लिंक असणे बंधनकारक आहे.
नोंदणी स्क्रिनवर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. सदर OTP क्रमांक नमूद करून सबमिट या बटणावर क्लिक करावे, म्हणजे आपली नामांकन भरण्यासाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे असे समजावे.एक व्यक्ती अथवा एक संस्था ही एकाच वेळी एका मोबाईलवर नोंदणी करू शकतील. नोंदणी झाल्यावर लॉगीन या बटणावर क्लिक करवे व लॉगीन आयडी व पासवर्ड नमूद करून साईन इन या बटणावर क्लिक करावे. तदनंतर आपल्यास पुन:श्च एकदा मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. सदर OTP क्रमांक नमूद करून सबमिट या बटणावर क्लिक करावे. म्हणजे आपल्यास नामांकन भरण्यासाठीचा फॉर्म उपलब्ध होईल. National Water Awards 2023 यावरती क्लिक करून Nominate/Apply Now या बटणावर क्लिक करून Category निवडावी आणि Do you wish to Nomitate yourself ? येथे डाव्या बाजूस गोलावर क्लिक करून सबमिट बटणावर क्लिक करावे.नामांकन स्क्रिनवर बँक खात्याचा तपशील व इतर मुद्यांची इंग्रजी अथवा हिंदी या भाषेमध्ये परिपूर्ण माहिती भरून Save and Next या बटणावर क्लिक करावे.

या पुरस्कारासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये जलसंवर्धनाचे व व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, समाजसंस्था किंवा उत्कृष्ट काम करणा-या व्यक्ती यांनी या स्पर्धेसाठी नामांकन भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्हयातून नामांकन भरलेल्या संस्था/ व्यक्ती यांनी आपली संक्षिप्त माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या sbmkolhapur@gmail.com या मेलवरती 18 डिसेंबर अखेर सादर करावी.