पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा दावा…

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त विधान केले होते. उर्जित पटेल हे आरबीआयच्या पैशाच्या ढिगाऱ्यावरचा साप आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी उर्जित पटेल¹ यांची तुलना केली होती, असा खळबळजनक दावा माजी अर्थ सचिव सुभाष गर्ग यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

सुभाष गर्ग यांचे ‘वुई आल्सो मेक पॉलिसी’ हे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. सुभाष गर्ग यांनी आपल्या या पुस्तकात लिहिलेय की, 2018मधील एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम गमावला होता. तत्कालीन आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची तुलना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसणाऱ्या सापाशी केली होती. 

सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तणावादरम्यान अर्थव्यवस्थेची समीक्षा करण्यासाठी 14 सप्टेंबर 2018 रोजी एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नरेंद्र मोदींनी उर्जित पटेलांवर संताप व्यक्त करीत त्यांची तुलना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसणाऱ्या सापाशी केली होती, असे या पुस्तकात म्हटले आहे. हार्पर कॉलिन्सद्वारा हे पुस्तक ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणार आहे. 

पटेल आणि तत्कालीन अर्थ मंत्री अरुण जेटली तसेच प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत जवळपास अडीच तास बैठक होऊनही पंतप्रधानांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले होते. या बैठकीला तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल, तत्कालीन अतिरिक्त प्रधान सचिव पी.के. मिश्रा, तत्कालीन डीएफएस सचिव राजीव कुमार, गर्ग आणि आरबीआयचे दोन डिप्टी गव्हर्नर विरल आचार्य आणि एन.एस. विश्वनाथन हे उपस्थित होते.

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त विधान केले होते. उर्जित पटेल हे आरबीआयच्या पैशाच्या ढिगाऱ्यावरचा साप आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी उर्जित पटेल यांची तुलना केली होती, असा खळबळजनक दावा माजी अर्थ सचिव सुभाष गर्ग यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

सुभाष गर्ग यांचे ‘वुई आल्सो मेक पॉलिसी’ हे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. सुभाष गर्ग यांनी आपल्या या पुस्तकात लिहिलेय की, 2018मधील एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम गमावला होता.

तत्कालीन आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची तुलना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसणाऱ्या सापाशी केली होती. सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तणावादरम्यान अर्थव्यवस्थेची समीक्षा करण्यासाठी 14 सप्टेंबर 2018 रोजी एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नरेंद्र मोदींनी उर्जित पटेलांवर संताप व्यक्त करीत त्यांची तुलना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसणाऱ्या सापाशी केली होती, असे या पुस्तकात म्हटले आहे.

हार्पर कॉलिन्सद्वारा हे पुस्तक ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणार आहे. पटेल आणि तत्कालीन अर्थ मंत्री अरुण जेटली तसेच प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत जवळपास अडीच तास बैठक होऊनही पंतप्रधानांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले होते. या बैठकीला तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल, तत्कालीन अतिरिक्त प्रधान सचिव पी.के. मिश्रा, तत्कालीन डीएफएस सचिव राजीव कुमार, गर्ग आणि आरबीआयचे दोन डिप्टी गव्हर्नर विरल आचार्य आणि एन.एस. विश्वनाथन हे उपस्थित होते.