
मुंबई : नियम आणि तरतुदींच्या आधारावर निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडन दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राहुल नार्वेकर घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे ठाकरे गटासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील.यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, मागण्या सगळ्यांच्या येत आहेत. मात्र कायद्याच्या आधारेच निर्णय घेण्यात येईल. विलंब करायचा नाही. जो निर्णय होईल तो कायद्याच्या चौकटीतच होईल. विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार त्यांना माहित आहे. अध्यक्षांची नियुक्ती नसताना उपाध्यक्षांकडे त्यांचे अधिकार असतात. मात्र अध्यक्ष असताना त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसतात.• घटनेनुसारच निर्णय घेतला जाईलनार्वेकर म्हणाले, कायद्यात जे प्रावधान आहे त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर 15 दिवसात निर्णय घेऊ. कोणाच्या इच्छेनुसार निर्णय होणार नाही. अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला तर आपल्याकडे अनेक मार्ग आहेत. मी जो निर्णय घेईन तो घटनेनुसारच घेईन.
