कबनूरमध्ये शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, 51 मेफेन्टर्मिन इंजेक्शन जप्त बिना परवाना इंजेक्शन विक्री करणारा तरुण अटकेत, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर:हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बिना परवाना मेफेन्टर्मिन इंजेक्शन विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत कॉलनी ते पाटील मळा जाणाऱ्या रस्त्यावर कबनूर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निखिल शंकर पाटील, रा. यशवंत कॉलनी, कबनूर या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

 

त्याच्या ताब्यातून मेफेन्टर्मिन सल्फेट या इंजेक्शनच्या 100 मिलीच्या 51 काचेच्या बाटल्या मिळून आल्या. यांची किंमत 15 हजार 504 रुपये आहे. याशिवाय 15 हजार रुपये किमतीचा एक व्हिवो कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला.

 

एकूण 30 हजार 504 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

तपासात आरोपीकडे या इंजेक्शनसाठी कोणताही परवाना किंवा डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करत आहेत.

 

🤙 8080365706