कोल्हापूर:एका लोकशाही राष्ट्राची खरी ताकद केवळ निवडणुकांत नसते, तर नागरिकांचा आवाज ऐकण्यात असते. जेव्हा एखादा नागरिक आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने उपोषण करतो, तेव्हा तो सरकारविरोधात नव्हे, तर लोकशाहीच्या चौकटीत न्यायाची याचना करत असतो.

सोनम वांगचुक गेल्या १४ दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत. कोणत्याही नागरिकासाठी एवढे दिवस उपोषण करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. अशा वेळी त्यांच्या मागण्यांवर संवाद होणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेणे ही लोकशाही व्यवस्थेची जबाबदारी आहे.
मतभेद असू शकतात, मागण्या योग्य-अयोग्य यावर चर्चा होऊ शकते; पण संवाद टाळणे हा कोणत्याही समस्येचा मार्ग नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा असतो.
आम्ही शांततामय आंदोलनाच्या आणि संवादाच्या तत्त्वांना पाठिंबा देतो. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, त्यांच्याशी संवाद साधावा आणि योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा.
लोकशाही तेव्हाच मजबूत राहते, जेव्हा सत्तेपेक्षा संवाद मोठा आणि मौनापेक्षा ऐकण्याची तयारी अधिक असते.
असे मत प्रमोद तोंदकर यांनी व्यक्त केले.
