
उचगाव : अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गॅस सिलेंडर, इंधनाची केलेली दरवाढ म्हणजे सर्वसामान्य जनतेची केलेली फसवणूक आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वच वस्तू व सेवांची दरवाढ जवळपास दुप्पट झालेली आहे. परंतु नागरिकांचे आर्थिक उत्पन्न तेवढ्या प्रमाणात वाढलेले तर नाहीच पण अनेकांच्या नोकऱ्याही गेलेल्या आहेत व देशामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. याच्या विरोधात करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वार येथे मोदी सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी महिलांनी रस्त्यावर चूल थाटून त्यावर भाकऱ्या थापत व गॅस सिलेंडरला हार घालून तसेच सरकारविरोधात बोंब मारून मोदी सरकारचा निषेध केला. तसेच यावेळी यावेळी शिवसैनिकांनी “या केंद्र सरकारच करायचं काय, खाली डोकं वर पाय” “चले जाव,चले जाव, मोदी सरकार चले जाव” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला”. यावेळी शिवसैनिकांनी गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किंमतीचे फलक गळ्यामध्ये अडकवलेले होते.
यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, २०१४ ला मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत व खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली मात्र सत्तेवर आल्यानंतर निवडणुकीवेळी दिलेले कुठलेही आश्वासन त्यांनी पाळले नाही. याउलट सध्या देशात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे.फक्त काही बड्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ करून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत होरपळत ठेवण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. सध्या देशात मोदी सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे जनता २०२४ ला मोदींना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. तसेच महागाई अशीच वाढत राहिली तर मोदी सरकार विरोधात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला. पोपट दांगट व विक्रम चौगुले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी उंचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच विराग करी, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट व अवधूत साळोखे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, तालुका प्रमुख विनोद खोत,उपतालुकप्रमुख राहुल गिरूले, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव व उपतालुकाध्यक्ष बाळासो नलवडे, अरविंद शिंदे, राहुल मोळे, आनंदा नाईक, विशाल सुर्यवंशी, योगेश लोहार, सचिन नागटिळक, विभागप्रमुख दिपक फ्रेमवाला, शाखाप्रमुख दिपक अंकल, किशोर कामरा,अजित चव्हाण, अजित पाटील, बाबुराव पाटील,उत्तम अडसूळ,अनिल माळी, राम पाटील, शफीक देवळे, वाहतूक सेनेचे प्रभाकर सावंत,अजित शिर्के, अजित रोटे, शरद चव्हाण,मेनुद्दीन जलगार, फेरीवाले महिला संघटनेच्या संगीता आवळे, शोभा वासुदेव, शशिकला भोसले, सुभद्रा टोपकर, मनीषा गायकवाड, शमीमबानू बागवान आदींसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
