
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस कोसळला आहे. अवकाळी पाऊसाने रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. अवकाळी पावसाने नाशिक जिल्हा पूर्ण झोडपून काढला आहे. यामध्ये द्राक्ष बागेबरोबरच कांदा, गहू यांसह हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खरंतर काढणीला आलेले पीक एका रात्रीत नाहीसे झाल्याने शेतकरी राजा उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्याचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारे आहे. खरं तर यंदाची वर्षी अतिवृष्टीमुळे पावसाळी पिकांनी पदरी निराशाच टाकली आहे. त्यानंतर रब्बी पीक तरी बळीराजाला सावरेल अशी परिस्थिती होती. मात्र त्यातची अवकाळी पाऊस आला आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.खरंतर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा ही प्रमुख पिके आहेत. त्याबरोबर गहू आणि हरभरा देखील हे पीक घेतले जाते. मात्र, सध्या सोमवारी मध्यरात्री आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना मोठा धक्का देणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले आहे.
