नामांतराच्या निर्णयावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा उद्यापासून आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिव करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे.मात्र याच नामांतराच्या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला होता. तर आता जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, 4 मार्चपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी 11 वाजेपासून या उपोषणाला सुरवात होणार आहे. याबाबत फेसबुक लाईव्ह करून जलील यांनी माहिती दिली आहे. याबाबत बोलताना जलील म्हणाले की, सरकराने आमच्या जिल्ह्याचे नाव बदलले आहे. मात्र अनेक नागरिकांना वाटत आहे की, शहराचे नाव औरंगाबादच असायला हवेत. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचा श्रेय मिळावा म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंर्तगत केले जाणार नाही.

🤙 8080365706