दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १३६ परीक्षा केंद्रावर ५३ हजार ६७५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सकाळी ११ ते २ या दरम्यान मराठीचा पहिला पेपर घेण्यात आला. पालकांच्या मागणीनुसार प्रत्येक पेपरला दहा मिनिटे वेळ वाढवून दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी बोर्डाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

यासाठी जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केल्याची पाहायला मिळत आहे.

🤙 8080365706