मा.आ. अमल महाडिक यांनी ५०० क्षयरुग्णांना दत्तक घेत समाजासमोर ठेवला आदर्श :जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी ९ सप्टेंबरला प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यासाठी दत्तक घेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत माजी.आम.अमल महाडिक यांनी ५०० रुग्णांना दत्तक घेत असल्याचे आज जाहीर केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार, व माजी आमदार अमल महाडिक व मान्यवरांच्या हस्ते त्यापैकी ५० रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहार कीट वाटप जिल्हाधिकारी कार्यालय येथील छत्रपती शाहूजी हॉल येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार अध्यक्षीय भाषाणात म्हणाले, मा. आमदार अमल महाडिक यांनी ५०० क्षयरुग्णांना दत्तक घेत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

टी.बी च्या उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांना पोषण आहार घेणे हे महत्वाचे आहे.यासाठी रुग्णांना भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे फूड बास्केट तयार करण्यात आली आहेत. तो आहार व्यवस्थित घेतल्या मुळे रुग्न लवकर बरा होईल.

यावेळी त्यांनी महाडिक यांच्या निर्णयाचे कौतुक करत समाजातील इतर दानशूर लोकांनीही अश्या पद्धतीने अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी.आम. अमल महाडिक म्हणाले .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत क्षयरोगाचे निराकरण करण्यासाठी निक्षय मित्र होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक सामाजिक जबादारी म्हणून रुग्णांना पोषण आहर देणे गरजेचे आहे. टी.बी. हा पूर्णपणे बरा होतो, कोणत्याही रुग्णांने कमीपणा न बाळगता पोषण आहार व्यवस्थीत घ्यावा. कोल्हापुर मध्ये दानशुर व्यक्तींची कमी नाही. यासाठी सर्वांनी पुढे यावे व हातभार लावावा. असे आवहन त्यांनी केले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी प्रस्ताविक मध्ये प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचे उद्देश बद्दल माहिती दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा जी कुंभार यांनी या अभियानाचे सध्याचे कामकाज, उदिष्ट्य याबाबत माहिती दिली. डॉ.विनायक भोई यांनी आभार मांडले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा जी कुंभार, माजी नगरसेवक नाना कदम, रुपाराणी निकम, आशिष ढवळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चीक्कोडे, आप्पा लाड, डॉ.विनायक भोई, विनोद नायडू, विशाल मिरजकर, माया जगताप, निलेश मोरे, दिया कोरे, अवधूत मेंडके व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

🤙 8080365706