समरजितसिंह घाटगे यांचा शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार

कागल (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या केवळ पोकळ घोषणा होती. मात्र नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे -फडणवीस सरकारने मागील सरकारला गेल्या अडीच वर्षात जे जमले नाही तो 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा विषय त्यातील जाचक अटी काढून टाकून तात्काळ देणेची घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीच्या वीज बिलाबाबत प्रति युनिट एक रुपये वीजदर कमी केल्याचीही घोषणा केली आहे. ही खरंच कौतुकाची बाब आहे असे गौरवउदगार भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काढले.

येथील शाहू कारखान्याच्या प्रधान कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने धोंडीराम चांभार (कागल ) यांच्या हस्ते समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

 

मागील सरकारने सतेवर येताच प्रामाणिक शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु, ही घोषणा केवळ फसवी ठरली. प्रत्यक्षात या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सरकारच्या विरोधात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. परंतु महाविकास आघाडी सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. अखेर सतेतून पायउतार होताना हे अनुदान देणेची घोषणा केली पण यामध्ये जाचक अटी घालून प्रामाणिक शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली. मात्र, सत्तेवर आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने अवघ्या 25 दिवसात कर्जमाफीचा आणि शेतकऱ्यांसाठी वीज दराबाबत सवलत देण्याचा विषय निघाली काढला असून हे प्रोत्साहन अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

🤙 8080365706