राजर्षि शाहू गव्हमेंट बँकेच्या कर्ज मर्यादेमध्ये वाढ : शशिकांत तिवले

कोल्हापूर( प्रतिनिधी) : येथील राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हंटस को-ऑप बँक ही शतकोत्तर वाटचाल करणारी शासकीय कर्मचाऱ्यांची बँक म्हणून यथोचित गौरविलेली राज्यातील एकमेव बँक आहे. बँकेच्या सभासदांची मागणी विचारात घेवून संचालक मंडळाने नुकताच कर्ज मर्यादेमध्ये वाढ करणेचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी दिली.


यामध्ये एकत्रित कर्जमर्यादा रु. 18 लाख इतकी करणेत आली असून आकस्मिक कर्ज मर्यादा रु. 1.50 लाख इतकी करणेत आली आहे. त्याचबरोबर बँकेमार्फत ” राजर्षि शाहू कृतज्ञता पर्व ठेव” योजना सुरु करणेत आली असून या ठेवीस 7.50% ” इतका भरघोस व्याजदर देणेत येत आहे. या ठेव योजनेस सर्वांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संचालक मंडळाने कर्ज मर्यादेमध्ये वाढ करुन बँकेचे पंचवार्षिक निवडणूकीचे जाहिरनाम्यामधील टप्प्याटप्प्याने वचनपूर्ती करणार असलेचे सांगितले.

वाढीव कर्ज मर्यादा सुविधेचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा. तसेच ठेवींवर देणेत येणाऱ्या भरघोस ठेव व्याजदाराचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष  शशिकांत  तिवले व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
🤙 8080365706