शाहू कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

कागलबहूजन समाज उद्धारक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उत्साहात साजरी केली.शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे पूजन संपन्न झाले. 

 

यावेळी कारखाना प्रधान कार्यालयातील कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेचे व कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पुतळ्यासही त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी कारखान्याचे संचालक युवराज पाटील,सतीश पाटील व भाऊसाहेब कांबळे यांनी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

 

यावेळी कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व जेष्ठ संचालक वीरकुमार पाटील,संचालक रमेश माळी,सुनील मगदूम ,संचालिका सौ.रेखा पाटील,सौ.सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, यांच्यासह शाहू ग्रूपमधील विविध संस्थाचे पदाधिकारी, कागल नगरपरिषदेचे नगरसेवक, शाहू प्रेमी नागरिक,कारखान्याचे सभासद शेतकरी,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706