कोल्हापूर:ऐतिहासिक दसरा चौक येथील छत्रपती शाहूजी महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त समतेच्या न्याय हक्कासाठी मानवी मूल्य रुजवणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज यांचे कार्य उल्लेखनीय तसेच सुशीत पीडित वंचित समाजासाठी एक आदर्श आहे

या आदर्श राजाचा आज जन्मदिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण देशभर साजरा केला जातो यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करत असताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणाले हा राजा एका कोण्या जातीचा नसून हा राजा संपूर्ण मानव जातीचा आहे त्यांच्या संस्थानामध्ये कोणत्याच जात,धर्म, पंथ या गोष्टीला थारा नव्हता अशा महान राजाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी अभिवादन करतो यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे म्हणाले समतेच्या न्याय हक्कासाठी मानवी मूल्य रुजवणारा राजा म्हणजे लोक राजा छत्रपती शाहू महाराज यांना रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या वतीने मी त्रिवार अभिवादन करतो यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आयु संजय जिरगे सर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे कृष्णात सडोलीकर, बटू भामटेकर,मारुती साखरेकर मामा,हरि कुर्डूकर, मलिक चिकदोळ यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
