धम्माला साजेसा लोकाभिमुख आणि पारदर्शी चेहरा द्या; रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची मंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी

कोल्हापूर:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )जिल्हा. कोल्हापूरच्या वतीने रोजी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात , ना. रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल मनोभावे सत्कार करण्यात आला.

 कोल्हापुरी फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या भावना नाम. आठवले यांच्या पर्यंत पोहोचवल्या.

 

 

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय धम्म परिषद कोल्हापूरमध्ये होणार आहे या परिषदेला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता मनापासून काम करणार आहे. परंतु धम्मपरिषद कोल्हापुरात होत आहे त्यामुळे लोक राजा छत्रपती शाहूंच्या या करवीर नगरीत धम्म परिषद व्हायचे असेल तर परिषदेचे नेतृत्व जिल्ह्याचे नेतृत्व हे पारदर्शी स्वच्छ आणि लोकाभिमुख असावे नामदार रामदास आठवले यांच्यावर प्रेम करणारा हा जिल्हा अलीकडच्या कालावधीत जनतेपासून फारच दूर गेलेला आहे आणि जुनी जाणते अनेक नेतृत्वापासून तरुणांच्या पर्यंत दुभंगलेल्या मानसिक स्थितीत असलेल्या जिल्ह्यात एकतर्फे धम्म परिषद केल्यास पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागले प्रचंड मोठा इतिहास असलेला हा जिल्हा यापुढे सुद्धा आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील आपण दिलेले सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून आणि पक्षाच्या कार्यात कणभर उणीव भासणार नाही याचे आश्वासन देताना कार्यकर्त्यांनी नेतृत्व बदलाचा आग्रह धरला त्याला ना. रामदास आठवले यांनी ही दुजेरा दिल्यामुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे या संदर्भात ना. रामदास आठवले यानी नेतृत्व बदलाचे संकेत दिले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला सत्काराचे नियोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष आयु.दत्ता मिसाळ(आण्णा), जिल्हा सचिव सतीश माळगे(दादा) यांनी केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे,जिल्हा संघटक दिलीप कोथळीकर, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कृष्णा सडोलीकर,पुंडलिक उर्फ बटूबामटेकर लक्ष्मण पारसे (अण्णा)इचलकरंजी, पुंडलिक कांबळे राधानगरी,हरी कांबळे कुरडू आणि मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या गांधीनगर पोलीस स्टेशनकडून दिल्या जाणाऱ्या जातीय वागणुकीच्या संदर्भात यावेळी महिलांच्या कडून नाम.रामदासजी आठवले यांना न्याय देण्याचे विनंती केली जिल्हा पोलीस प्रमुख यांना फोन करून बोलण्याच्या आश्वासन ना.रामदास आठवले यांना दिले.

🤙 8080365706