भाजपचे सरचिटणीस वैभव हिरवे यांचे सामाजिक राजकीय कार्य उल्लेखनीय -आमदार राहुल आवाडे

कोल्हापूर:जनता पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी वैभव हिरवे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

 

यावेळी बोलताना आमदार आवाडे यांनी वैभव हिरवे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत पक्षवाढीसाठी त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वैभव हिरवे यांनी आपल्या निवडीबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे

🤙 8080365706