मुंबई : मुंबईत आरोग्यभवन कार्यालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या 150 दिवसांच्या मूल्यांकनात आरोग्य विभागाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी आप आपली जबाबदारी प्रामाणिकपने पार पाडावी अशा सुचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
कर्मचाऱ्यांनी जनतेची कोणतीही कामे प्रलंबित ठेवू नयेत. आरोग्य यंत्रणा सर्वात खालच्या माणसापर्यंत पोहचवा. विभागात सर्व नस्तीवर तातडीने कार्यवाही करा. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच जबाबदारी पार न पडणाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असुन, दिलेल्या सूचनांची तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
15 व्या वित्त आयोगाच्या निधीची आढावा घेतला व 16 व्या वित्त आयोगाच्या संबंधी चर्चा झाली. तसेच बजेट व पूरवणी मागणी संदर्भात चर्चा झाली.
बैठकीला आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक,विरेंद्र सिंह सचिव 2, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक मुंबई डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड संचालक (पुणे), संचालक (शहरी) डॉ. स्वप्नील लाळे, यांचेसह अवर सचिव व सहसंचालक,स्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.