कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजाचा आढावा घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व श्री क्षेत्र केदारेश्वर जोतिबा या दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्यसह संपूर्ण देशातील भाविकांचा आणि कोल्हापूर वासियांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील सर्व यंत्रणेचे तसेच लोकप्रतिनिधींचे याबाबत त्यांनी अभिनंदन व्यक्त करून मंदिराच्या संवर्धनासह भाविकांच्या सोयीची कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना केल्या.
मंदिर परिसरातील विविध भाविकांच्या सोयींमध्ये वाढ व्हावी, आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने करावी, एक कालबद्ध कार्यक्रम आखून कामाला सुरुवात व्हावी या पद्धतीच्या सूचना दिल्या.
मंदिर व मंदिर परिसरातील विविध विकास कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आल्या आहे. मात्र याचबरोबर येत्या काळात पुढील नियोजन करीत असताना शहरांमध्ये मंदिरापर्यंत येण्या-जाण्याचे मार्ग किंवा तेथील परिसरही चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून मंदिरापर्यंत बाहेरून येणाऱ्या पर्यटक भाविकांना सहज पोहोचता येईल.
राज्यमंत्री मंडळाने या दोन्ही विकास कामांना मंजूर दिल्याने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे याबाबत लवकरच शासन निर्णय ही येईल. काम करणाऱ्या यंत्रणांना एक कालबद्ध कार्यक्रम आखून देऊन कामे वेळेत आणि अखंडित सुरू होतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर ,जिल्हाधिकारी तथा पश्चिम देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.