चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्य प्रेरणादायी -राजे समरजितसिंह घाटगे मुरगूड येथे वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिरात५६० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

मुरगूड, प्रतिनिधी :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे शैक्षणिक, आरोग्य तसेच विविध क्षेत्रांतील कार्य आदर्श आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राजे फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.

 

 

 

त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा व राबविलेल्या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होत असल्याचे गौरवोद्गार काढत त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

मुरगूड (ता. कागल) येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजे फाउंडेशन व राजे बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात ५६० हून अधिक नागरिकांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून त्यामध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, “चंद्रकांतदादा पाटील यांनी वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू ग्रुपतर्फे राबविले जाणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत. विशेषतः राजे फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर सुरू असलेले आरोग्यविषयक उपक्रम सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.”

यावेळी व्यासपीठावर राजे बँकेचे संचालक अमर चौगुले, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक अरुण पाटील, नगरसेवक विजय राजिगरे, दिग्विजय पाटील, सरपंच सुहास मोरे, डॉ. प्रविण कंदारे ,अनंत फर्नांडिस,अनिल अर्जुने, पृथ्वीराज कदम,वसंत प्रभावळे,विशाल सूर्यवंशी, रणजीत सूर्यवंशी, प्रवीण चौगुले, रामभाऊ खराडे, सदाशिव गोधडे, मयूर सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात आकाशदीप, अथायु, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, संकल्पसिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच ग्रामीण रुग्णालय मुरगूडच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त बबन बारदेस्कर यांचा तर महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याबद्दल विशाल मडीलगेकर व मयूर भिके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राहुल खराडे यांनी स्वागत केले. राजे बँकेचे संचालक दत्तामामा खराडे यांनी प्रास्ताविक केले, तर माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी आभार मानले.

.

🤙 8080365706