कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत ‘क्लॉथ पेंटिंग प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर स्पर्धकांच्या आग्रहास्तव आज दुसरे प्रशिक्षण शिबिर सुरु करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रशिक्षण शिबिर तीन दिवस सुरू राहील या प्रशिक्षणास प्रशिक्षिका सुचिता बेंडके या प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरातून महिलांना ही कला शिकता यावी, यामधून एक नवा रोजगार तयार होईल व त्यातून आर्थिक उत्पन्न मिळेल या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे, असे वैष्णवी महाडिक यांनी यावेळी सांगितले.