कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी तानाजी दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासनाने निर्णय जाहीर केला या नियुक्तीबद्दल सभापती प्रकाश देसाई यांनी दळवी यांचा सत्कार केला.
समितीचे विद्यमान सचिव गजानन पाटील यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्या ठिकाणी पदोन्नतीनुसार दळवी यांची सचिव म्हणून निवड झाली आहे.
दळवी हे गेली 35 वर्षे बाजार समिती कार्यरत असून त्यांनी आज पर्यंत विविध पदावर काम केले आहे
या कार्यक्रमास सभापती प्रकाश देसाई, उपसभापती सोनाली पाटील, सदस्य भारत पाटील भुयेकर ,शंकर पाटील,राजाराम चव्हाण,शेखर देसाई, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील, सूर्यकांत पाटील,मेघा देसाई,संदीप वरंडेकर,सुयोग चौगुले – वाडकर, शिवाजीराव पाटील, नानासो कांबळे, पांडुरंग काशीद, नंदकुमार वळंजू ,कुमार आहुजा, दिलीप पोवार आदी उपस्थित होते.