म्हालसवडे / प्रतिनिधी
कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सीनियर सर्जन डॉ. सोपान चौगुले यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल
‘राज्यस्तरीय’ अत्यंत प्रतिष्ठेचा “यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ कृतज्ञता दिपस्तंभ गौरव पुरस्कार सन २०२५ – २६” हा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह, कराड येथे शिवांजली फाऊंडेशन” च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. एस. चोपडे हे होते. समारंभाची सुरुवात डॉ. अर्पणा चौगुले यांच्या ‘शिवराज्याभिषेक’ या पेंटिंगच्या पूजनाने झाली.
जेष्ठ सहित्यहिक प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, रुग्णाच्या सेवेत व्यस्त असताना सुद्धा मोकळ्या वेळेचा उपयोग समाज उन्नतीसाठी तसेच तरुणाना प्रेरणा व नवचैतन्य देण्यासाठी डॉ. सोपान चौगुले यांनी आरोग्य व आहार याचे मार्गदर्शन लेखणीतून केले आहे. त्यांना सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातल्या प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवार्थ हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहे.
या समारंभास कोल्हापूरच्या ज्येष्ठ शिक्षण तज्ञ
श्रीमती सरोज एन. डी. पाटील, मा. आमदार राजू आवळे , डॉ. डी. पी. खाडे, मेजर प्रा. प्रशांत कदम, प्रवीणकुमार जगताप, डॉ. हणमंतराव कराळे-पाटील, अक्षय सुर्वे व मान्यवर उपस्थित होते