आ. अमल महाडिक यांच्या हस्ते पुलाची शिरोली येथे दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप कार्यक्रम

कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने लोक सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते 161 दिव्यांगाना 3,54,200 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे असे मत यावेळी आ. महाडिक यांनी व्यक्त केले.यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी,विस्तार अधिकारी ए एस कटारे, ग्रामविकास अधिकारी कोळी मॅडम, लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 9921334545