जुने दानवाड येथील क्रीडाप्रेमी तरुणांसाठी 48 गुंठे जागा क्रीडांगणासाठी मंजूर

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.या युवकांना योग्य सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. याच अनुषंगाने जुने दानवाड येथील क्रीडाप्रेमी तरुणांसाठी ४८ गुंठे जागा क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली आहे.

 

 

जयसिंगपूर येथे दानवाड ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रीडांगण मंजुरी आदेशाची प्रत आ. यड्रावकर व तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी सरपंच श्रीमती राजश्री तासगावे,उपसरपंच बंडू अंबुपे, ग्रामपंचायत सदस्य आदगोंडा पाटील, महावीर पाटील,मल्लिनाथ पाटील, बापूसो बेडकिहाळे,महावीर चौगुले, आनंद पाटील,अमोल पाटील,प्रकाश मलिकवाडे,भरमू गुरव,रवींद्र पाटील, शीतल पाटील,प्रवीण वडगावे,संजय तिपण्णानावर,शिवराज तासगावे,पी. बी. पाटील,अमेय मलिकवाडे, दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.