कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील मराठा समाज विकासापासून वंचित राहू नये, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे.समाजासाठी सभागृह, स्मशानभूमी यांसह मुलांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासिकेची इमारतही बांधण्यात आली आहे.भविष्यातही मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
हेरवाड येथील मराठा समाजाच्या स्मशानभूमीसाठी आ. यड्रावकर यांच्या प्रयत्नातून पाच गुंठे जमीन मंजूर करण्यात आली. याबद्दल समस्त मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
हेरवाड येथील मराठा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी,ही त्यांची अनेक वर्षांची मागणी होती.अखेर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पाच गुंठे जमीन मंजूर करण्यात आली आहे.भविष्यातही मराठा समाजाच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.यावेळी माझ्या व तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते मंजूर आदेशाची प्रत मराठा समाज बांधवांना देण्यात आली.
यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष बंडू घोलप,हेरवाडचे उपसरपंच भरत पवार,संभाजी मस्के,दत्तात्रय जोंधळे,पत्रकार संतोष तारळे,सदाशिव मस्के,तानाजी मस्के,विश्वास गुरव,महादेव मस्के,ऋषिकेश मस्के,संतोष तेरवाडे, रंजेश कडते,अमृत चव्हाण,संजय तेरवाडे,एकनाथ पाटील,मोहन फक्के,वैभव मस्के,संतोष शिरोळे, लालू शिंदे,संताजी चव्हाण,जयसिंग मस्के,अशोक पवार यांच्यासह विशाल खडके,अनिल पाटील व मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.