कोल्हापूर – एसटीमध्ये चोरी करणाऱ्या महिलेस अटक, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त. पल्लवी चौगुले (वय २०,आंबेडकरनगर, हातकणंगले) या महिलेला पोलिसांनी एसटी बसमध्ये चोरी केलेल्या दागिन्यासह अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून ८७ ग्रॅम
सोनं आणि ३० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले.
या दागिन्यांची एकूण किंमत साडेसहा लाख रुपये आहे. महिलेस कुरुंदवाड पोलिसांनी चोरीची कबुली दिली असून, तपास सुरू आहे. एसटीमध्ये चोरी करणाऱ्या महिलेस अटक, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.