कोल्हापूर : विनिता पाटील ( ताईसाहेब ) यांच्या यशस्वी फौंडेशन मार्फत आयोजित दख्खन महोत्सव 2025 या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके हे उपस्थित राहिले.विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना दख्खन कार्यगौरव सन्मान व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते, यशस्वी फौंडेशनचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे आ. नरके यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
नरके यांनी यशस्वी फौंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला बाबासाहेब पाटील , सुभाष पाटील,भारत पाटील ,गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, तसेच यावेळी युवा नेते जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.