धनंजय महाडिकांनी घेतली हसन मुश्रीफांची भेट

कोल्हापूर : माजी पालकमंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय संपादन केला आहे. यानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक उपस्थित होते.

 

 

याप्रसंगी जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे , पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी सुलभ व काटेकोरपणे नियोजन केल्याबद्दल त्यांचेही महाडिक यांनी अभिनंदन केले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध विषयांवर चर्चा यावेळी केली आणि सर्व कामे पूर्ण करण्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.